पुणे : पुण्यातून एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. खराडी भागातील नदीपात्रात एका तरुणीचा मृतदेह आढळला आहे. विशेष म्हणजे या मृतदेहाचे हात, पाय आणि डोकेही कापून टाकण्यात आले आहे. या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.
चंदन नगर परिसरात मुळा-मुठा नदी पात्रात एका तरूणीचा मृतदेह आढळला आहे. या मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपीने त्या तरूणीचे हात, पाय आणि डोके धडापासून वेगळे करत तिचा मृतदेह नदीपात्रात फेकून दिला. मृत तरूणी १८ ते २० वयोगटातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
अद्याप मृत तरुणीची ओळख पटली नसून पोलिसांकडून हात, पाय आणि डोक्याचा शोध घेण्यात येत आहे. तसेच याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे. पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने धारदार शस्त्राने या तरुणीची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.