मुंबई : काँग्रेसच्या माजी नगरसेविका हेमलता पाटील या मंगळवारी शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाल्या आहेत. नाशिकची जागा काँग्रेसला सोडण्याची विनंती शरद पवारांना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
हेमलता पाटील म्हणाल्या की, "छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जमीनदोस्त झाल्याने सर्वसामान्य माणूस दुखावला गेला आहे. यावर काँग्रेस पक्षाची भूमिका आणि यावर आपण कशाप्रकारे प्रतिक्रिया द्यावी, याबाबतवर बोलण्यासाठी आम्ही पवार साहेबांची भेट घेत आहोत," असे त्या म्हणाल्या.
हे वाचलंत का? - मुंबईत शरद पवार गटाकडून 'इतक्या' जागांची मागणी! मविआचा तिढा सुटणार?
त्या पुढे म्हणाल्या की, "नाशिक मध्यमधून काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यासाठी मी इच्छूक आहे. गेल्या सहा टर्मपासून मी नाशिक महानगरपालिकेत काँग्रेसच्या चिन्हावर जिंकून येत आहे. यावेळीही नाशिक मतदारसंघ काँग्रेसकडे राहावा, अशी आमची भूमिका आहे. पवार साहेब महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आहेत. त्यामुळे हे सगळं त्यांच्या कानावर घालणार आहे. या जागेसाठी सर्वांनी मिळून काँग्रेस पक्षाला मदत करावी आणि नाशिकची जागा काँग्रेसला सोडावी," अशी विनंती त्यांना करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे,