राज्यातील विमानतळाच्या विकासासाठी निधीचे वितरण

राज्य सरकारकडून ६८.२५ कोटी रुपयांचे निधी वाटप

    27-Aug-2024
Total Views |

airport


मुंबई, दि.२७:
राज्यातील गोंदिया, कराड, छत्रपती संभाजीनगर या विमानतळाच्या कामांसाठी राज्य सरकराने मंजूर निधीपैकी ६२.२५ कोटींचा निधी वितरित केला आहे. यानिधीतून या विमातळांसाठी जमीन अधिग्रहण आणि विकासकामे करण्यात येतील. राज्य सरकारने हा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरीत करण्यास मंजुरी देत असल्याचा शासन निर्णय जारी केला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार, वित्त विभागाने मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी ६८.२५ कोटी इतका निधी वितरीत केला आहे. त्यापैकी गोंदिया विमानतळासाठी रू.५.९५ कोटी, कराड विमानतळासाठी रू.२० कोटी, छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी रू.३२.३० व आर.सी.एस. योजनेंसाठी रू.१० कोटी असा एकुण रु.६८.२५ कोटी इतका निधी राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरीत करण्यास मंजुरी दिल्याची माहिती दिली आहे.

या निधीतून करण्यात येणारी कामे
 
गोंदिया विमानतळ

गोंदिया विमानतळाकरीता रस्त्यांच्या वळतीकरणासाठी भूसंपादन करण्यासाठी रू. ५.९५ कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

कराड विमानतळ

कराड विमानतळ प्रकल्पातील मौजे वारुंजी, मुंढे व केसेमधील बाधितांच्या पुनर्वसनासाठी मौजे वारुंजी, ता. कराड येथील जमीन संपादित करण्यासाठी राज्य सरकारने रू.२०कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर विमानतळ

छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी १३९ एकर जमिनीचे भूसंपादन करण्यासाठी रू.३२.३० कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे.

प्रादेशिक जोडणी योजना(RCS) अंतर्गत विमानतळ

प्रादेशिक जोडणी योजने(RCS)अंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील विमानतळांसाठी लागणाऱ्या विविध सोयीसुविधा देण्यासाठी लागणारा निधी म्हणून रु. १० कोटी इतका निधी वितरित करण्यात आला आहे.