महाजेनकोने सुरू केला सौर ऊर्जा प्रकल्प; ७० मेगावॅट क्षमता
26-Aug-2024
Total Views |
मुंबई : ऊर्जा क्षेत्रातील कंपनी महाजेनकोने धुळे जिल्ह्यातील साक्रीतील शिवाजीनगर येथे ७० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. साक्री-१ येथे (२५ मेगावॅट), साक्री-२ (२५ मेगावॅट), साक्री-३ (२० मेगावॅट), साक्री-१ येथे २५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम मेसर्स गोदरेज अँड बॉयस, एक ईपीसी विकासक यांनी केले आहे. दरम्यान, क्रिस्टलीय सौर पॅनेलसह वार्षिक वीज निर्मिती ४५.०९ दशलक्ष युनिट्स अपेक्षित आहे.
दरम्यान, साक्री-१ दि. २१ ऑगस्ट रोजी कार्यान्वित करण्यात आले असून २२०/३३ KV शिवाजीनगर साक्री सब स्टेशनला यशस्वीरित्या जोडण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे आतापर्यंत ५० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. आता महाजेनकोची एकूण सौर ऊर्जा स्थापित क्षमता ४२८ मेगावॅटवर पोहोचली आहे. .या उर्जानिर्मिती प्रकल्पाकरिता महाजेनकोने १५ मेगावॅट सौर उर्जेच्या वितरणासाठी एसईझेड बायोटेक सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्यात करार करण्यात आला आहे.
ऊर्जामंत्र्यांनी महाजेनकोचे अभिनंदन केले
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ मेगावॅट सौर प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केल्याबद्दल महाजेनकोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
साक्री-१ सौर प्रकल्पाची वैशिष्ट्ये
साक्री-1 सौर प्रकल्पाकरिता ५२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून या प्रकल्पाची किंमत ९३.१२ कोटी आहे. या प्रकल्पातून निर्माण होणारी वीज खुल्या बाजारात विकली जाणार आहे. तसेच, साक्री-१, २ आणि ३ सौर प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर एका ठिकाणी सुमारे १९५ मेगावॅटची एकूण स्थापित क्षमता असलेला हा सौर प्रकल्प साक्रीला महाजेनकोचे "सोलर हब" म्हणून ओळखला जाईल.