भारतीय अर्थव्यवस्थेत ५५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची क्षमता; 'आयएमएफ' कार्यकारी संचालकांचे महत्त्वाचे विधान
26-Aug-2024
Total Views |
मुंबई : भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात वेग धरण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(आयएमएफ)चे कार्यकारी संचालक कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी अर्थव्यवस्थेबाबत मोठे भाष्य केले असून २०४७ पर्यंत ५५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. तसेच, डॉलरच्या दृष्टीने विकास दर १२ टक्के राहिल्यास भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात वेग धरेल.
दरम्यान, आयएमएफचे कार्यकारी संचालक सुब्रमण्यन यांच्या म्हणण्यानुसार, डॉलरच्या दृष्टीने विकास दर १२ टक्के राहिला तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आकार २०४७ पर्यंत ५५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. तसेच, कोरोना साथीच्या काळात देशाचा प्रतिसाद उर्वरित जगापेक्षा वेगळा होता, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.
ते म्हणाले, दीर्घकाळात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन दर एक टक्क्यांपेक्षा कमी राहिल्यास अर्थव्यवस्थेचे मूलभूत तत्त्वे दिसून येतील. सध्याच्या अर्थव्यवस्थेचा आकार ३.८ ट्रिलियन असून २०४७ मध्ये संभाव्य आकार ५५ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाजदेखील सुब्रमण्यन यांनी वर्तविला आहे. अर्थव्यवस्थेचे उच्च औपचारिकीकरण उच्च उत्पादकतेबाबत जगाच्या तुलनेत भारतीय औपचारिक क्षेत्राची उत्पादकता वाढवण्यास अजूनही वाव आहे, असे सुब्रमण्यन म्हणाले.