मुंबई - महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाच्या सांस्कृतिक विभागातर्फे स्व. शांताबाई जोग स्मृती एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या एकांकिका स्पर्धेचे हे ४२ वे वर्ष आहे. ९ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीत चेंबूर येथील महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाच्या सभागृहात ही स्पर्धा होणार आहे. प्रथम प्रवेश घेणाऱ्या पहिल्या १६ एकांकीकांनाच स्पर्धेत प्राधान्य दिले जाणार आहे. विजयी होणाऱ्या सर्वोत्कृष्ट एकांकिकेला रोख रक्कम १५,००० आणि स्व. शांताबाई जोग फिरता चषक, सर्वोत्कृष्ट दुसऱ्या एकांकिकेला १०,००० आणि सर्वोत्कृष्ट तिसऱ्या एकांकिकेला ७,५०० अशी पारितोषिके असणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख ३० ऑगस्ट आहे. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ५०० रुपये आहे.