"शाळेत नमाजी टोप्या चालतात पण कपाळाला लावलेला टीळा पुसतात", उत्तर प्रदेशातील हिंदू विद्यार्थ्यांची व्यथा

    26-Aug-2024
Total Views |
 
Hindu Students Injustice
 
लखनऊ : शाळेत नमाजी टोप्या परिधान केलेल्या चालतात पण कपाळाला लावलेला टीळा पुसायला सांगतात असा दावा विद्यार्थ्याने केला. आयशा नावाच्या शिक्षिकेवर हिंदू विद्यार्थ्यांनी आरोप करत सुनावले आहे. शाळेत नमाजी टोप्या घातल्या जातात मात्र कपाळावर टीळा लावलेला चालत नसल्याची व्यथा स्वत: विद्यार्थ्याने व्यक्त केली आहे. विद्यार्थ्याचे नाव मयंक असून त्याने शाळेत सुरू असलेल्या प्रकाराबाबत सांगितले आहे. उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील ही धक्कादायक घटना आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील बिजनौर येथील बानेरा येथे उच्च माध्यमिक शाळेत घडलेल्या प्रकरणाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने उडी घेत निषेध व्यक्त केला आहे. शाळेत शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्यांनी राष्ट्रीय स्वयं सेवक संघातील कार्यकर्ता अक्षयला घडलेल्या घटना अनेकदा सांगितल्या आहेत. शिक्षिका आय़शा भेदभाव करत असल्याचे अक्षयने सांगितले आहे. तसेच शाळेतून विद्यार्थ्यांना मशीदीत नेले जाते, याप्रकारणाविरोधात अक्षय़ने कारवाईची मागणी केली आहे.
 
 
 
याप्रकरणात शाळेतील मुख्यध्यापकांनी भाष्य केले असून ते म्हणाले की, शाळेतील शिक्षक हे कट्टरपंथी असल्याने विद्यार्थ्यांना नमाजी टोपी परिधान करण्यास सांगतात. तसेच शिक्षकच विद्यार्थ्यांना जवळच्या मशीदीत नमाजासाठी घेऊन जात असल्याचे मुख्यध्यापकांनी सांगितले आहे.
 
मिळालेल्या तक्रारीची दखल घेण्यात आली असून तपास सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तथ्य असलेल्या माहितीचा आधार घेत पोलीस यंत्रणा पुढील तपास करत आहेत.