रांची : आदिवासी लोकांच्या जागेवर कट्टरपंथींनी ताबा मिळवला असल्याची घटना झारखंड येथील जामताड़ा जिल्ह्यात घडली. आदिवासी लोकं ज्या ठिकाणी देवाची पूजा करायचे त्याच जागेवर कट्टरपंथींनी कबर बसवल्या आहेत. याचा अर्थ कट्टरपंथींनी जामताडा येथील आदिवासींच्या जागेवर ताबा मिळवला असल्याचा दावा झारखंड येथील भाजप नेत्यांनी केला. यामुळे हे लँड जिहादचे प्रकरण असल्याचे बोलले जात आहे. यामुळे झारखंड येथील आदिवासी आणि कट्टरपंथींमध्ये वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणी भाजपने झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना धारेवर धरले. तसेच याप्रकरणात सरकारला जाब विचारलेला आहे.
हे प्रकरण जामताड़ा जिल्ह्यातील नारायणपूर येथील आहे. २४ ऑगस्ट रोजी याच भागातील शहारपूर पंचायतीमध्ये राहणाऱ्या पिथुआडीह गावातील रहमतुल्ला यांचा मृत्यू झाला होता. रहतुल्ला यांची अंत्ययात्रा काढून कट्टरपंथी युवक रहतुल्लाला संबंधित जागेवर दफन करण्यात आले होते. ही माहिती आदिवासींना समजताच त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
झारखंड में आदिवासियों का उत्पीड़न कब रुकेगा?
संथाल परगना क्षेत्र में संताल आदिवासियों की धार्मिक जमीन पर मुसलमान का शव दफना कर 'लैंड जिहाद' को अंजाम दिया जा रहा है।
जामताड़ा के नारायणपुर थाना क्षेत्र में संतालो की पुरातन पतीत जमीन पर मुसलमानों ने जबरन रहमतुल्लाह का शव दफन कर… pic.twitter.com/k2xSxf9SK2
घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी पोलिसांनी कट्टरपंथींची बाजू उचलून धरली होती. यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यानंतर अंतिम क्षणी पोलिसांनी रहतुल्लाचा मृतदेह संबंधित जागेवर पुरण्यात आला.
याप्रकरणात आदिवासींनी नाराजी व्यक्त केली असून पोलिसांनी हे प्रकरण एकतर्फी असल्याचे सांगितले आहे. स्थानिक प्रशासन हे कट्टरपंथींना पाठीशी घालत असल्याचे आदिवाशी लोकांचे म्हणणे होते. तणावाची परिस्थिती पाहता परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. झारखंडचे भाजप नेते बाबूलाल मरांडी यांनी या कारवाईला 'लँड जिहाद' असे म्हटले.