काश्मीरी स्थलांतरितांसाठी २४ मतदान केंद्रांची स्थापना
जम्मूत २४, उधमपूरमध्ये १ आणि दिल्लीत ४ केंद्रे
24-Aug-2024
Total Views |
नवी दिल्ली : आगामी जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीत काश्मिरी स्थलांतरितांना मतदान करता यावे यासाठी निवडणूक आयोगाने जम्मू, उधमपूर आणि नवी दिल्ली येथे २४ विशेष मतदान केंद्रे स्थापन केली आहेत. काश्मीर खोऱ्यातून विस्थापित झालेल्या आणि जम्मू आणि उधमपूरमध्ये राहणाऱ्या लोकांना लोकसभा निवडणुकीप्रमाणे फॉर्म-एम भरावा लागणार नाही, असे जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी पांडुरंग पोले यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, जम्मू, उधमपूर आणि दिल्लीतील विविध मदत शिबिरांमध्ये राहणारे काश्मिरी स्थलांतरित मतदार, ज्यांनी निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (ईव्हीएम) वैयक्तिकरित्या मतदान करण्याचा पर्याय निवडला आहे, ते २४ मतदान केंद्रांवर करू शकतात. त्यांच्यासाठी जम्मूमध्ये १९, उधमपूरमध्ये १ आणि दिल्लीत ४ केंद्रे स्थापन करण्याचत आल्याचेही आयोगाने सांगितले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला ऐतिहासिक निर्णय कायम असेल, असेही सांगण्यात आले आहे. त्यानुसार, जम्मू आणि उधमपूरमधील स्थलांतरित मतदारांना फॉर्म-एम भरण्याची पूर्वीची आवश्यकता काढून टाकण्यात आली आहे. झोन आणि कॅम्पमध्ये राहणारे मतदार त्यांच्याशी मॅप केले जातील, असेही पोले यांनी सांगितले आहे.