मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Muslim Shopkeeper) उत्तर प्रदेशातील बिजनौर जिल्ह्यात एका अल्पवयीन हिंदू मुलाला इतर हिंदूंसोबत कापून टाकण्याची धमकी दिल्याचे प्रकरण शुक्रवारी (२३ ऑगस्ट) निदर्शनास आले आहे. पीडित मुलगा मुस्लिमबहुल भागातील दुकानात काही वस्तू घेण्यासाठी गेला असता दानिश नावाच्या दुकानदाराने ही धमकी दिल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. सदर प्रकरण बिजनौर जिल्ह्यातील कोतवाली नगर पोलीस स्टेशन परिसरातील आहे.
पीडित मुलाचे वडील दीपक सैनी यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, २३ ऑगस्ट रोजी त्यांचा मुलगा काही वस्तू घेण्यासाठी जवळच्या दुकानात गेला होता. तेव्हा दुकानाचा मालक दानिश म्हणाला, “तुम्ही हिंदू खूप उड्या मारता. कापल्यानंतरच तूम्ही थांबाल.” यावेळी दानिशने मुलावर शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे. पीडित मुलगा घाबरून संपूर्ण घटनाक्रम कुटुंबीयांना सांगितला. सध्या या प्रकरणातील तक्रारीची दखल घेत पोलिसांनी दानिशविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. भारतीय न्याय संहिता कलम ३०२, ३५१ (२) आणि ३५२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.