मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Kumar Vishwas Bangladesh Crisis) बांगलादेशातील सत्तापालटानंतर तेथील हिंदू आणि अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सुप्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनी मोठे विधान केले आहे. बांगलादेशात फक्त हिंदू मुलींवरच अत्याचार का होतात, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. शुभंकर मिश्रा यांच्यासोबत झालेल्या एका पॉडकास्ट दरम्यान ते बोलत होते.
बांगलादेशबाबत बोलताना ते म्हणाले, "शेख मुजीबुर रहमानचा पुतळा तोडताना पाहिला. जो जमाव त्यांचा पुतळा तोडत आहे, त्यांच्या पूर्वजांनीही अत्याचार सहन केले आहेत. या जमावाच्या पूर्वजांनी मूर्तीची विटंबना करणाऱ्या लोकांचे अत्याचार सहन केले. बांगलादेशात आरक्षणाच्या निषेधार्थ विरोध होत असेल तर हिंदूंची मंदिरे का जाळली जात आहेत. हिंदू मुलींवर अत्याचार का केले जात आहेत? भारताने ज्या पद्धतीने विरोध करायला हवा होता, तसा विरोध केला नाही. हा १९६४ चा भारत आता राहिला नाही. राफेल विमाने कशासाठी ठेवली आहेत?"