हिंदू महिलेशी मैत्री केली, नंतर भेटायला बोलावून पाजले मद्य आणि केला अमानुष अत्याचार, कट्टरपंथी अल्ताफचे हैवानी कृत्य!

    24-Aug-2024
Total Views |

Altaf
 
बंगळुरू : दोन कट्टरपंथी युवकांनी कर्नाटकातील उड्डपी जिल्ह्यातील २१ वर्षीय हिंदू महिलेचे अपहरण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी अल्ताफ आणि त्याच्या साथीदारांचे नाव असून त्यांनी हिंदू महिलेवर अत्याचार केला आहे. याप्रकरणात पीडितेला बेशुद्ध करत तिचे अपहरण केले गेले. या घटनेप्रसंगी आरोपी अल्ताफ आणि त्याचा कट्टरपंथी साथीदार जुबेर यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
 
दरम्यान ही धक्कादायक घटना उड्डपीच्या करकला शहरात घडली आहे. पीडित महिला आणि अल्ताफ यांची सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि त्यानंतर दोघांनी एकमेकांचा विश्वास मिळवत एकमेकांचे फोन नंबर घेत अल्ताफने हिंदू महिलेस भेटण्याचा आग्रह धरला.
 
यावेळी अल्ताफ आपल्या तीन मित्रांसोबत चारचाकी वाहन घेऊन पीडितेला भेटायला आला. त्यावेळी तिला कारमध्ये बसवून तिला जबरदस्ती मद्यप्रशान करायला लावले. यावेळी पीडित महिला बेशुद्ध झाली. यावेळी जुबेरच्या हातात मद्य होते. त्यावेळी अल्ताफने पीडितेचे लैंगिक शोषण केले.
 
यावेळी अल्ताफने आणि जुबेरने पीडितेला तिच्या घराच्या भोवताली रस्त्याच्या कडेला सोडून दिले आणि ते तिथून निघून गेले. त्यानंतर पीडितेच्या परिसरातील नागरिकांना पीडितेची अवस्था पाहून तिला रूग्णालयात दाखल केले. ही घटना स्थानिकांना कळताच गोंधळ सुरू झाला. याचप्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी जुबेर आणि अल्ताफला ताब्यात घेतले. यावेळी अल्ताफचे आणखी एक वाहन पोलिसांनी जप्त केले आहे. तसेच इतर दोन साथीदारांच्या शोधात पोलीस तपास करत आहेत.