वायनाड पूरग्रस्तांना गोवा राजभवनाची मदत

    24-Aug-2024
Total Views |

Goa Rajbhavan

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Goa Raj Bhavan)
वायनाड आणि विलनगड येथील भूस्खलनामुळे बाधित झालेल्यांसाठी गोवा राजभवनाकडून आर्थिक मदत सेवा भारतीला नुकतीच सुपूर्द करण्यात आली. कोझिकोड, केरळ येथे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक एस. सेतुमाधवन यांना मदत सुपूर्द केली. राज्यपाल म्हणाले की, सेवा भारतीचे कार्यकर्ते हे समाजासाठी समर्पित जीवन जगतात. दयाळू मानसिकतेने ते आपली सेवा करतात.
सेवा भारतीला आर्थिक मदत देताना स्वयंसेवक म्हणून योगदान दिल्याबद्दल त्यांनी समाधानही व्यक्त केले आहे. कुलगुरु या नात्याने राज्यपालांनी गोवा विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार मदतकार्यासाठी बाजूला ठेवण्याची विनंती केली आहे. सेवेकडे केवळ उदारतेचे कृत्य म्हणून न पाहता कर्तव्य म्हणून पाहिले पाहिजे, असे नमूद करत त्यांनी समाजात सेवेची भावना वाढविण्याच्या महत्त्वावर भर दिला. सेवाकार्याकडे ईश्वरी सेवा म्हणून पाहावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे.