मुंबई - २१ व्या ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल’ साठी नोंदणी करण्याचे आणि चित्रपट पाठविण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. ‘आशियाई सिनेमा’, ‘समकालीन भारतीय सिनेमा’ आणि ‘समकालीन मराठी सिनेमा’ अशा तीन विभागांमध्ये चित्रपटांची निवड या चित्रपट महोत्सवात केली जाणार आहे. या महोत्सवात ‘भारतीय चित्रपट पुरस्कार’, ‘समकालीन मराठी सिनेमा पुरस्कार’, ‘आशियाई चित्रपट सांस्कृतिक पुरस्कार’, ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ आणि ‘कै. सुधीर नांदगावकर स्मृती पुरस्कार’ अशा स्वरूपाचे पुरस्कार दिले जाणार आहेत. २०२३ नंतर प्रदर्शित झालेले चित्रपटच या पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणार आहेत. चित्रपट पाठविण्याची अंतिम तारीख ५ नोव्हेंबर आहे. या महोत्सवाविषयी अधिक माहिती ‘थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलच्या’ अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.