मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bageshwar Baba appeal to hindus) बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी भोपाळच्या छतरपूर जिल्ह्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सर्व हिंदूंनी आपल्या नावाआधी 'हिंदू' असा वापर करावा, असे आवाहन केले. ते म्हणाले, "आपण सर्वजण आपल्या नावापुढे आपली जात लावतो. परंतु नावापुढे हिंदू लावले तर इतर देशातून येणारे लोक आपल्याला हिंदू म्हणून ओळखतील."
पत्रकारांना संबोधत पुढे ते म्हणाले, "भारतात जातीवादाचे संकट खूप वाढले आहे. 'करो या मरो' अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताला भव्य बनवायचे असेल तर भारतातून जातीवाद संपवावा लागेल. जेव्हा जेव्हा कोणी परदेशी भारतात येतो तेव्हा त्याने हिंदूंना भेटावे, इतर कोणत्याही जातीला नाही. यासाठी आपल्या नावापुढे हिंदू लावणे गरजेचे झाले आहे."