आसाम बलात्कार प्रकरणातील आरोपीचा मृत्यू

    24-Aug-2024
Total Views |

Aassam Sexual Harassment
 
दिसपुर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आसाम येथील आरोपीचा मृत्यू झाला आहे. आसामच्या पोलिसांनी आरोपी तफझुलच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याला २४ ऑगस्ट रोजी सकाळी पहाटे ४ वाजता घटनास्थळी आणण्यात आले होते. त्यावेळी त्याने आपला जीव वाचवण्याकरीता तलावात उडी घेतली. त्यामुळे आरोपी तफझूलचा तलावाच्या पाण्यात मृत्यू झाला.
 
याप्रकरणात पोलिसांनी लक्ष घालत बचाव कार्याद्वारे तलावात उडी घेतेलल्या आरोपीचा शोध घेतला. काही वेळानंतर आरोपीचा मृतदेह बचाव कार्याने बाहेर आणला. दरम्यान आरोपी तफजूलवर बलात्काराचा गंभीर आरोप आहे. १४ वर्षाची अल्पवयीन मुलगी आसाम येथील धींग येथून शालेय शिक्षणाचा तास आटोपून येत होती. यावेळी तफजूलसह काही युवकांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला.
 
 
 
नागांवचे एसपी स्वप्निल यांनी घडलेला प्रकार प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितला की, आरोपीच्या तपासासाठी त्याला घटनास्थळी आणण्यात आले होते. मात्र त्याने आपला बचाव करण्यासाठी घटनास्थळी असलेल्या एका तलावात उडी घेतली. त्यावेळी बचाव मोहिमेने घटनास्थळी दाखल होत आरोपीचा मृतदेह बाहेर काढला. दरम्यान याप्रकरणातील इतर दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
 
धींग येथे पीडित अल्पवयीन मुलगी शिकवणीचे तास करून पुन्हा आपल्या घराकडे परतली होती. त्यावेळी आरोपी तफजूल इस्लामसह इतर दोघेजण घटनास्थळी पोहोचले. यावेळी त्यांनी पीडितेवर अमानुष अत्याचार केले. यावेळी पीडितेला रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले होते. घटनास्थळी असलेल्यांनी पोलिसांना घडलेल्या घटनेची तक्रार केली.
 
याप्रकरणात आता धींग येथील नागरिक पीडितेच्या न्यायाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरली आहेत. विद्यार्थी संघटनेने बंदची हाक दिली आहे. आरोपीने केलेल्या कृत्याविरोधात कडक बंद पाळण्यात आला आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेशी संबंधित आवाज उठवण्याचे काम केले आहे.