गुलीगत सुरज चव्हाण 'बिग बॉस'नंतर गाजवणार मोठा पडदा

    23-Aug-2024
Total Views |

suraj chavan  
 
 
मुंबई : मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनमध्ये सध्या गुलीगत धुमाकूळ घालणारा सूरज चव्हाण महाराष्ट्रातील जनतेचं मन नक्कीच जिंकत आहे. आता लवकरच तो चित्रपटात झळकणार असून प्रेक्षकांना अधिक वेड लावणार असंही दिसून येत आहे. सूरज चव्हाण ‘राजाराणी’ या चित्रपटातून मोठा पडदा गाजवताना दिसणार आहे.
 
काही दिवसांपूर्वीच ‘राजाराणी’ या चित्रपटाच्या पोस्टरने सगळ्यांची मनं जिंकली असून सूरज सत्य घटनेवर आधारित उलगडणार्‍या या प्रेमकथेतून महत्वाची भूमिका साकारणार आहे. राजाराणी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे दिसणार आहेत. तर, सुरजसह या चित्रपटात भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे अशी कलाकारांची फौज असणार आहे.
 

raja rani  
 
‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केली आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. सूरजचा ‘राजाराणी’ हा चित्रपट १८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.