लखनऊ : समाजवादी पक्षाचे उत्तर प्रदेशातील नेते मोईद खान यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. आयोध्या जिल्हा प्रशासनाने गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी मोईद खानचे शॉपिंग मॉल बुलडोजरद्वारे पाडण्यात आले आहे. मोईद खानने अनधिकृत जागेत शॉपिंग सेंटर बांधले असल्याचा योगी सरकारचा दावा आहे. यामुळे योगी सरकारने मोठे पाऊल उचलले. यासोबतच कन्नौजमध्येही बुलडोझरद्वारे संबंधित अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, शॉपिंग सेंटरचा काही भाग हा तलावाच्या जागेवर बांधण्यात आला होता. दरम्यान संबंधित इमारतीत राहणाऱ्या भाडेकरूंना नोटीस बजावण्यात आली होती. यावेळी या इमारतीत पीएनबी बँक होती. त्या बँकेमुळे अनधिकृत इमारत पाडण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. यावेळी बँकेने कोणताही हस्तक्षेप न केल्याने संबंधित इमारतीवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान पाडलेल्या शॉपिंग सेंटरच्या इमारतीची किंमत ही ३ कोटी रूपये होती. तसेच शॉपिंग सेंटर हे ४ हजार चौरस फुट होते. शॉपिंग सेंटर हे तलावाच्या बाजूला बांधण्यात आले होते. भदरसा शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी म्हणून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
सपा नेता मोईद खान आणि त्याचा नोकर राजू यांच्यासह इतर १२-१२ जणांवर हिंदू मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. ३० जुलै रोजी पुरकलंदर पोलीस ठाणे हद्दील हा धक्कादायक प्रकार घ़डला होता. त्याप्रकरणानंतर भदरसा शहरातील संबंधित बेकरीवर योगी सरकारने बुलडोजर चालवत अनधिकृत बेकरीवर कारवाई केली. याप्रकरणात आता मिळालेल्या माहितीनुसार, मोईद आणि राजू यांनी दोन महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता आणि या कृत्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केले होते. याप्रकरणात पीडितेचा गर्भपात झाला असून डीएनए जतन करून ठेवले होते.