सनी देओल 'या' अभिनेत्यासोबत देशासाठी लढणार! २७ वर्षांनी 'बॉर्डर २'ची घोषणा

    23-Aug-2024
Total Views |
 
border 2
 
 
मुंबई : आजवर हिंदी चित्रपटसृष्टीत देशावर आधारित अनेक चित्रपट आले. पण त्यापैकी बॉर्डर हा चि६पट आजही आवर्जून पाहिला जातो. देशप्रेमाची भावना जागवणारा ९०च्या दशकातील अजरामर चित्रपट 'बॉर्डर'. १९९७ साली प्रदर्शित झाला होता.ज्यात सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना अशी तगडी स्टारकास्ट होती. आता तब्बल २७ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत असून नुकतीच 'बॉर्डर २'ची घोषणा करण्यात आली आहे.
 
'बॉर्डर २' ची खासियत म्हणजे यात आथा अभिनेता वरुण धवन दिसणार आहे. वरुण धवनने सोशल मिडियावर या चित्रपटाची छोटीशी झलक दाखवणारा व्हिडिओ शेअर करत रिलीज डेट जाहीर केली आहे. या व्हिडिओमध्ये वरुण धवन "दुश्मन की हर गोली से जय हिंद बोलकर टकराता हूँ...जब धरती माँ बुलाती है सब छोडकर आता हूँ...हिंदुस्थान का फौजी हूँ मै", असे बोलत आहे.
 

border 2 
 
हा व्हिडिओ शेअर करत त्याने पोस्टही लिहिली आहे. "मी चौथीत होतो तेव्हा चंदन सिनेमागृहात जाऊन बॉर्डर चित्रपट पाहिला होता. त्याचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झाला होता. अजूनही आठवतंय मला तो सिनेमा हॉल देशप्रेमाने गजबजून गेला होता. नैसर्गिक आपत्तींमध्येही बॉर्डरवर उभं राहून आपलं रक्षण करणाऱ्या जवानांना माझा सलाम! बॉर्डर २ मध्ये काम करणं हे माझ्या करिअरमधील खास क्षण आहे. सनी पाजीबरोबर काम करायला मिळाल्याने हे अजून खास बनलं आहे", असं धवनने पोस्टमध्ये लिहिलं आहे. दरम्यान, 'बॉर्डर २' हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ मध्ये चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून प्रजासत्ताक दिनाचं प्रेक्षकांना खास खास गिफ्ट मिळणार आहे.