कट्टरपंथी युवकांकडून गायींची तस्करी

23 Aug 2024 18:38:20

Cow Smuggling 
 
लखनऊ : हिंदू धर्मात गाईला हिंदूंची गोमाता म्हणून संबोधले जाते. मात्र आता त्याच गोमातेची तस्करी होत आहे. उत्तर प्रदेशातील बदयू येथील कट्टरपंथी युवक नाझीमने गोमातेची तस्करी केली आहे. याचपार्श्वभूमीवर इस्लामनगर पोलीस हद्दीत हा प्रकार घडला होता. त्यामुळे पोलिसांनी तस्करी करणाऱ्या कट्टरपंथींना अटक केली आहे. त्याचे दोन साथीदार शकील आणि मोनीश अंधाराचा फायदा घेत फरार झाले.
 
मिळालेल्या माहितीनुसार, नाझीम आणि त्याचे साथीदार हे जनांवरांची तस्करी करतात. पोलिसांना याप्रकरणाची माहिती मिळताच २१ ऑगस्ट रोजी विक्रमपूर चारसौरा वळणावर संशयित गाड्या रोखण्यात आल्या. त्यानंतर त्याठिकाणी एक टेम्पो रोखला गेला. टेम्पे थांबल्यानंतर तस्करी पळू लागले. यावेळी संबंधित तस्करी करणाऱ्यांचा पाठलाग केला आणि त्यांनी गोळीबार केला.
 
 
 
यावेळी प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार केला. त्यावेळी नझीमच्या पायाला गोळी लागली आणि तो तिथेच खाली पडला. पोलिसांनी नाझीमकडून एक पिस्तूल, काडतुसे, मांस कापण्याची साधने दोरी, लाकडी ठोकळा आणि टेम्पो जप्त केला. या चकमकीत एक पोलीसही जखमी झाल्याची माहिती देण्यात आली. 
 
 
 
नाझीमला अटक केल्यानंतर पोलिसांनी नाझीमकडून माहिती काढली. त्यावेळी नाझीमने सांगितले की, गाय तस्करीसाठी २५ हजार रूपयांचे बक्षिस देण्यात येणार होते. त्यामुळे त्याने आणि त्याच्या साथीदारांनी गाय तस्करीचे पाऊल उचलले. दरम्यान, पोलिसांनी त्याला पकडले असून त्याच्या साथीदारांना लवकरच पकडले जाणार असल्याचे सांगण्यात आले. 
 
 
Powered By Sangraha 9.0