मुंबई : कांतारा या कन्नड चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केलेले अभिनेते ऋषभ शेट्टी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर गंभीर टीका केली आहे. ते म्हणाले की, हिंदी चित्रपटसृष्टी भारताला मोठ्या पडद्यावर चुकीच्या पद्धतीने दाखवत आहेत. आता ऋषभ शेट्टीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर हा मुद्दा चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.
ऋषभ शेट्टीने एका मुलाखतीदरम्यान त्यांनी हिंदी चित्रपटांवर टीका करणारं वक्तव्य केलं आहे. ऋषभ शेट्टीने हिंदी आणि बॉलीवूड चित्रपटांमध्ये भारताच्या नकारात्मक प्रतिमेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऋषभ शेट्टी म्हणाले की, 'बॉलिवूड भारताला चुकीच्या प्रकाशात दाखवते.' त्याच्या या वक्तव्यानंतर ऋषभ शेट्टी ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. 'मेट्रो सागा'ला दिलेल्या मुलाखतीत त्याने हे वक्तव्य केलं आहे. या मुलाखतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पुढे तो म्हणाला की, "भारतीय चित्रपट, विशेषतः बॉलिवूड, भारताला वाईट प्रकारे दाखवतात. बॉलिवूड चित्रपटांना जागतिक कार्यक्रमांसाठी आमंत्रित केलं जातं आणि रेड कार्पेट दिलं जातात. माझं राष्ट्र, माझं राज्य, माझी भाषा-माझा अभिमान. जागतिक स्तरावर ते सकारात्मक पद्धतीने का घेतलं जात नाही आणि मी तेच करण्याचा प्रयत्न करतो."
ऋषभ शेट्टीच्या या वक्तव्यावर नेटकऱ्यांकडून तीव्र प्रतिक्रिया देत त्याच्यावर निशाणा साधला आहे. तसेच, कांतारातील काही दृश्यांचे उदाहरण देत लोकांनी त्याला 'हिपोक्रॅट' देखील म्हटलं आहे. तर काहींनी, त्याला दुटप्पी म्हटलं आहे. कांतारा सिनेमातही काही वाईट सीन होते. आणि हा बॉलिवूडला नावं ठेवतोय, असं नेटकऱ्यांनी म्हटलं. दरम्यान, कांतारा १ च्या यशानांतर २०२५ मध्ये कांतारा २ भेटीला येणार आहे.