जान्हवीने मर्यादा ओलांडल्या तरी पॅडी दादांनी मोठेपणाने तिला केलं माफ, म्हणाले, 'झालं गेलं...'

    22-Aug-2024
Total Views |
 
Janhavi Killekar
 
 
मुंबई : मराठी बिग बॉसचा ५ वा सीझन जोरातच गाजत आहे. पंरतु, या सीझनमध्ये आलेल्या काही सदस्यांनी मर्यादा ओलांडून आपल्यापेक्षा वयाने आणि करिअरमध्येही सिनियर असलेल्या कलाकारांना मना न ठेवता त्यांना नको नको ते बोल लावले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर हिने ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या अभिनयावरुन आणि त्यांना दिलेल्या राज्य पुरस्कारांबद्दल बोलली होती. आणि आता पंढरीनाथ कांबळे यांच्याशी बोलताना जान्हवी किल्लेकरची पुन्हा एकदा जीभ घसरली. टास्कदरम्यान, सुरुवातीला निक्कीने पॅडी दादांना 'जोकर' म्हटलं होतं. तर, जान्हवीने नंतर त्यांच्या कारकिर्दीचा, अभिनयाचा अपमान केला. जान्हवीच्या या घाणेरड्या वक्तव्यामुळे प्रेक्षकांमध्ये आणि कलाकारांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं. विशाखा सुभेदार, सुरेखा कुडची, अभिजीत केळकर, सिद्धार्थ जाधव त्याचबरोबर पॅडी दादांची मुलगी ग्रीष्मा या सर्वांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत जान्हवीला चांगलंच धारेवर धरलं आहे.
 
पंढरीनाथ यांचा अपमान केल्यामुळे दुसऱ्या दिवशी जान्हवीने स्वतः जाऊन त्यांची माफी मागितली. जान्हवी एकटीच सोफ्यावर बसलेली असताना तिच्या डोळ्यातलं पाणी पाहून धनंजय तिच्याकडे जातो आणि तुला काय झालं? असं विचारतो. यावर जान्हवी म्हणाली, 'मी गेम खेळताना अति बोलते दादा' धनंजय तिची समजूत काढत तिला सांगतो, 'टिक आहे. आता कालचा दिवस गेला. आता नवीन दिवस उगवला आहे. हा खेळ आहे आणि आपण प्रतिस्पर्धी आहोत. तू भांडतेस हे चूक नाही पण तुझे शब्द चुकतात आणि करिअरवरून बोलणं चुकीचं आहे.'
 
पुढे ते म्हणाले की, 'मी देवाकडे प्रार्थना केली होती की, देवाने तुला खूप मोठी अभिनेत्री बनवावं आणि तुला एवढा स्टॅन्ड घेता यावा की, मी या माणसासोबत काम करणार नाही. पण मी हे करू शकतो. मी विचारेन कोण आहे? जान्हवी किल्लेकर ना? बॉस मी नाही काम करणार! असं मी ठरवलं होतं. पण मी माणूस आहे, मी बाप आहे, मी भाऊ आहे. त्यामुळे झालं गेलं राहुदेत. आता तू रडू नकोस. खेळात आपण जीव तोडून भांडूया, हा खेळ खेळूया फक्त एकमेकांचं करिअर..एक जो स्तर असतो तो निश्चित पाळूया आणि एकमेकांचा आदर ठेऊन भांडूया.'