मुंबई : चालू आर्थिक वर्षात देशाचा देशांतर्गत उत्पादन(जीडीपी) वाढीचा दर सहा टक्के अपेक्षित आहे, असा अंदाज रेटिंग एजन्सी 'आयसीआरए'ने वर्तविला आहे. तसेच, सरकारी भांडवली खर्च कमी झाल्यामुळे आणि शहरी ग्राहकांची मागणी कमी झाल्यामुळे एप्रिल-जून तिमाहीत भारताची आर्थिक वाढ ६ टक्क्यांपर्यंत मंदावण्याची अपेक्षा आहे. गेल्या सहा तिमाहीत सर्वात कमी असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, 'आयसीआरए'ने संपूर्ण आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) ६.८ टक्के वाढीची अपेक्षा केली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये नोंदविण्यात आलेल्या ८.२ टक्क्यांपेक्षा कमी आहे. रेटिंग एजन्सीने निवेदनात म्हटले आहे की, "सरकारी भांडवली खर्चातील कपात आणि घट यामुळे आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपी सहा टक्क्यांपर्यंत घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
गेल्या सहा तिमाहीत सर्वात कमी असून शहरी ग्राहक मागणी कमी असेल. दरम्यान, पहिल्या तिमाहीत देशाचा जीडीपी वाढीचा दर ६ टक्के अपेक्षित आहे. तर दुसरीकडे, गेल्या वर्षीच्या प्रतिकूल मान्सूनचा परिणाम आणि २०२४ च्या मान्सूनची असमान सुरुवात यामुळे ग्रामीण मागणीत कोणतीही व्यापक सुधारणा झाली नाही. आयसीआरएने आर्थिक वर्ष २०२४-२५ करिता जीडीपी आणि जीव्हीए(एकूण मूल्यवर्धित) वाढीचा दर अनुक्रमे ६.८ टक्के आणि ६.५ टक्के असा अंदाज व्यक्त केला आहे.