धक्कादायक! तीन वर्षांच्या मुलीला चॉकलेट देत लैंगिक शोषण

22 Aug 2024 13:58:59


Child Sex Abuse 
 
हैद्राबाद : तेलंगणातील सिद्धीपेट येथील ३ वर्षांच्या मुलीवर अजय नावाच्या युवकाने लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना घडली आहे. या घटनेने तेलंगणात एकच खळबळ उडाली आहे. तीन वर्षांच्या मुलीला चॉकलेट देत तिला आपल्या खोलीत बोलावून तिचे लैंगिक शोषण केले असून ही घटना १९ ऑगस्ट रोजी घडली आहे. याप्रकरणात संशयित आरोपी अजयला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवक हा उत्तर प्रदेशातील असून तो पेशाने चित्रकार आहे. पीडित मुलगी ज्या गृहसंकुलात वास्तव्यास होती. त्याच ठिकाणी आरोपी युवक वास्तव्य करत होता. यावेळी अजयने तीन वर्षाच्या मुलीला चॉकलेट देत खोलीत बोलावून तिचे लैंगिक शोषण केले. दरम्यान पीडितेच्या अजोबांनी घडलेली घटना पोलिसांना सांगितली होती. घटनेच्या दुसऱ्या दिवशी अजयला पोलिसांनी ताब्यात घेत मुसक्या आवळल्या आहेत.
 
दरम्यान, पीडितेला सिद्धीपेठ येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच सध्या पीडितेवर उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. डॉ. बी. अनुराधा यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांच्या तपासाला गती देण्याचे आणि लवकरात लवकर आरोपपत्र देण्याचे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0