बांगलादेशी हिंदूंना स्थलांतरीत करण्याऐवजी 'सशक्त करणे' गरजेचे : डॉ. राम माधव

22 Aug 2024 17:21:12

Ram Madhav on Bangaladeshi Hindu

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ram Madhav on Bangladesh Crisis)
"बांगलादेशातील हिंदूंना भारतात स्थलांतर करण्यास सांगणे हा काही उपाय नाही. उलट त्यांना सशक्त करणे आणि त्यांच्या तत्त्वांचे पालन करणाऱ्या चांगल्या सरकारच्या अंतर्गत त्यांची सुरक्षा सुनिश्चित करणे हा कायमचा उपाय आहे.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अ.भा.कार्यकारिणी सदस्य लेखक डॉ. राम माधव यांनी केले.

हे वाचलंत का? : जन्मठेप नको; दोषींना फाशीच झाली पाहिजे!

बंगळुरुच्या जयनगर येथील आर.व्ही. टीचर्स कॉलेजच्या सभागृह मंथना, कर्नाटक आयोजित कार्यक्रमात त्यांनी ‘डेव्हलपमेंट इन इंडियाज् नेबरहूड : बांगलादेश अॅण्ड अदर्स' या विषयावर उपस्थितांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात बांगलादेशचा इतिहास, त्याची निर्मिती, पाकिस्तानशी असलेले संबंध आणि शेख हसीनाच्या सरकारच्या पतनास कारणीभूत असलेले विद्यार्थी आंदोलन याविषयी थोडक्यात माहिती देऊन केली.

राम माधव यावेळी म्हणाले, बांगलादेशातील हिंदू हे बांगलादेशचे अविभाज्य घटक आहेत. शेख हसीना यांच्याशी भारताचे मैत्रिपूर्ण संबंध होते. भारत सरकार बांगलादेशच्या राजकीय संकटात हस्तक्षेप करत नसून येथील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेची काळजी करत आहे. बांगलादेश हा सार्वभौम देश असला तरी, आपण सर्व एका महान सभ्यतेचा भाग असल्यामुळे भारतासोबत आपले भावना आणि भावनिक बंध कायम आहे. साधारण १.४ कोटी हिंदू बांगलादेशचा अविभाज्य भाग आहेत आणि बौद्ध आणि ख्रिश्चनांसह सर्व अल्पसंख्याकांनी बांगलादेशला आपला देश म्हणून स्वीकारले आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांसाठी आव्हाने आहेत, परंतु आम्हाला आशा आहे की ते या गोंधळातून बाहेर येतील आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणारे सरकार लवकरच येईल.”

Powered By Sangraha 9.0