नवी दिल्ली : अमेरिकेतील कट्टरपंथीने तब्बल १३०० महिलांचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. त्यामध्ये दोन वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. माणुसकीला काळीमा लावणारे कृत्य कट्टरपंथी युवक उमर एजाजने केले आहे. त्याने १३०० व्हि़डिओ आपल्या हार्डडिस्कमध्ये साठवून ठेवले आहेत. पोलिसांनी याप्रकरणात लक्ष घातले असून पुढील तपास सुरू आहे.
पोलीसांनी या प्रकरणात ही हार्डडिस्क रिकव्हर केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या प्रकरणात पोलिसांनी वॉरंट जारी केला आणि आरोपी उमर एजाजला अटक केली आहे. एजाजची अन्य कुठली गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत. एजाज भारतातून वर्कींग व्हिजाच्या आधाराने बंगळूरूहून अमेरिकेत आला. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत अनेक ठिकाणी काम केले. त्याने काम करत असलेल्या एका ठिकाणच्या तरण तलावाच्या चेंजिंग रूममधील अनेक महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत. तसेच तो एका रूग्णालयात फिजिशियन म्हणून काम करत होता. तिथेही त्याने महिलांचे व्हिडिओ रेकॉर्ड केले आहेत.