एकांकिका लेखकांना राज्यस्तरीय पुरस्कार जिंकण्याची संधी

22 Aug 2024 11:57:30

रंगभूमी  
ठाणे : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मुलुंड शाखेच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त ‘राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. एकांकिका पाठवण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी ५०० रुपये आहे. विजेत्या स्पर्धकांसाठी प्रथम पारितोषिक पांच हजार रुपये आणि प्रशस्ति पत्रक, द्वितीय पारितोषिक तीन हजार रुपये आणि प्रशस्ति पत्रक, तृतीय पारितोषिक दोन हजार रुपये आणि प्रशस्ति पत्रक आणि उत्तेजनार्थ पारितोषिक एक हजार रुपये आणि प्रशस्ति पत्रक असे पारितोषिकांचे स्वरूप असणार आहे. अधिक माहितीसाठी ९८२११२४८९०, ९५९४५५८४३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
 
 
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0