मोहम्मद आलमने बुक केले होते हॉटेल, त्याच हॉटेलमध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत युवतीचा मृतदेह

21 Aug 2024 15:00:49

Uttar Pradesh Crime
 
लखनऊ : मोहम्मद नावाच्या कट्टरपंथी युवकाने आपल्याच नावाने हॉटेल बुक केले होते. त्यानंतर त्याठिकाणी २० वय वर्षे असलेल्या तरूणीचा मृतदेह सापडला आहे. ही हत्या मोहम्मद आलमने केली असल्याचा संशय आहे. पीडितेच्या शरीरावर चाकूने अनेक हल्ले केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. यानंतर मोहम्मद आलम १९ ऑगस्ट रोजी फरार असल्याने ही हत्या मोहम्मद आलमने केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. याप्रकरणात पोलीस अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
उत्तर प्रदेशातील बरेलीच्या कोतवाली पोलीस ठाणे हद्दीतील ही घटना आहे. १८ ऑगस्ट २०२४ रोजी मोहम्मद आलम नावाच्या मुलाने ‘प्रीत पॅलेस’ नावाच्या हॉटेलची खोली बूक केली होती. एका दिवसानंतर मोहम्मद तिथून बाहेर पडला. त्यावेळी हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना तरूणी खोलीत असल्याचा संशय आला होता. त्यावेळी मोहम्मद पुन्हा येईल असे तिथल्या कर्मचाऱ्यांचा समज होता. मात्र तसे झाले नाही. २४ तास उलटून गेले मात्र मोहम्मद हॉटेलमध्ये पुन्हा आला नाही.
 
मंगळवारी हॉटेलच्या संबंधित रूममधून दुर्गंधी येऊ लागली होती. त्यावेळी हॉटेल व्यवस्थापकांनी घडलेली माहिती पोलिसांना दिली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. मोहम्मद आलमला त्यांनी संशयित ठरवून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता, त्यांच्यावर चाकूने वार केलेल्या जखमा होत्या.
 
याप्रकरणात पीडितेची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तिच्या ओळखपत्रांवरून वैयक्तिक माहिती मिळवण्याचा पोलीस तपास करत आहेत. हॉटेल व्यवस्थापकांसोबत याप्रकरणात चर्चा केली जात असून तपास सुरू करण्यात आला आहे. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता. फॉरेन्सिक टीमची मदत घेतली जात आहे. यावेळी फॉरेन्सिक लॅबने याप्रकरणात झालेली हत्या नियोजनबद्ध कट असू शकतो असा संशय आहे. तसेच पीडितेचा मृतदेह सध्या रूग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0