मुंबई : बदलापूरात झालेल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी (Badlapur School Sexual Case) देशातील प्रतिष्ठित वकील उज्ज्वल निकम पीडितेची बाजू मांडण्यासाठी न्यायालायत प्रतिनिधीत्व करणार आहे. देशाच्या एनडीए सरकारने लहान मुलींवर झालेल्या लैंगिक आत्याचाराविरोधात उज्ज्वल निकम लहान मुली आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणार आहेत. याप्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट आहे. यामुळे आंदोलकांनी बदलापूर लोकल रेल्वेरूळावर ठिय्या दर्शवला आहे. याप्रकरणात २०० हून अधिक आंदोकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याचपार्श्वभूमीवर आरोपीला येत्या २४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणात लक्ष घातले असून लवकरात खटला चालवावा असा आदेश दिला आहे. तसेच याप्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्याचप्रमाणे २६/११ ला झालेल्या मुंबई हल्ल्यात आतंकवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा मिळवून देणारे हे प्रज्ज्वल निकमच होते.
बदलापूरातील लैंगिक प्रकरण काय आहे?
बदलापूरातील बालवाडीत शिक्षण घेणाऱ्या लहान मुलींवर बलात्कार झाल्याची घटना घडली. ही घटना १३ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात आले आहे. ३-४ वर्षांच्या लहान मुलींवर अमानुष अत्याचार करण्यात आला. लहान मुली शौचालयासाठी गेल्या असता, त्याठिकाणी शाळेच्या कर्मचाऱ्याने त्या मुलींवर पाळत ठेवली होती. त्यावेळी नराधमाने हे अमानुष कृत्य केले आणि एका मुलीने आपले कपडे काढण्यात आली होती असे सांगितले होते.
एका मुलीने आपल्या गुप्तांगाला मुंग्या चावत असल्यासारखे वाटत असल्याचे सांगितले, तर दुसऱ्या मुलीचे हायमन तुटल्याचे आढळून आले होते. या दोन्ही लहान मुली आरोपीला दादा म्हणत होत्या. याविरोधात पीडितांच्या कुटुंबियांनी आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी गुन्हेगाराचे नाव अक्षय शिंदे असे असून त्याने संबंधित शाळेत १ तारखेपासून सफाई कामगार म्हणून काम करायला सुरूवात केली होती. पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.