'लाडकी बहिण' योजनेचं अभिनेत्रीकडून विशेष कौतुक, म्हणाली, "महिला सक्षमीकरणाच्या दिशेने..."

20 Aug 2024 14:42:51
 
eknath shinde
 
 
 
मुंबई : राज्य सरकारच्या मुख्यमंत्री 'लाडकी बहीण' योजनेला सध्या उत्तम प्रतिसाद मिळताना दिसत आहे. तसेच, सर्वच क्षेत्रात सरकारच्या या योजनेची चर्चा देखील सुरु आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्यामुळे महिला वर्गात विशेष आनंद आणि उत्साह होता. दरम्यान, सरकारच्या या योजनेचं अनेकांकडून कौतुकही केलं जात असताना आता हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने देखील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर भाष्य करत कौतुक केलं आहे.
 
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मिडियावर पोस्ट करत राज्य सरकारचं कौतुक केलं आहे. तिनं लिहलं, "मुख्यमंत्री लाडकी बहीन योजना कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील 1.5 कोटींहून अधिक महिलांना आता दर महिन्याला आर्थिक हातभार लाभेल. अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यास सुरुवात केली आहे. ही एक आनंददायक गोष्ट आहे. महाराष्ट्रातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने ही मोठी झेप आहे. या उत्कृष्ट उपक्रमाबद्दल राज्य सरकारचे खूप खूप अभिनंदन!".
 
 
 
दरम्यान, लाडकी बहीण योजनेबद्दल सांगायचे झाल्यास महिलांना दरमहा १५०० रुपये याप्रमाणे जुलै व ऑगस्ट महिन्यांचे तीन हजार रुपये बँक खात्यात जमा होण्यास १५ ऑगस्ट २०२४ पासून सुरूवात झाली आहे.
Powered By Sangraha 9.0