वाशी : अपना बाईक टॅक्सी असोसिएशनच्या माध्यमातून दि. १ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र परिवहन विभागाचे लक्ष वेधण्यासाठी नवी मुंबई आरटीओमध्ये सबंधित अधिकाऱ्यांकडे बाईक टॅक्सी संदर्भात मागण्याचे निवदेन देण्यात आले. या निवेदनात बाईक टॅक्सी सेवेला परवानगी मिळावी. तसेच सोपी परमिट प्रक्रिया राबवून एकाच ठिकाणी सर्व क्लीअरन्स मिळवून ५०० रुपयांपर्यंत फी ठेवावी अशी मागणी करण्यात आली. यासाठी नवी मुंबई आरटीओ येथे मोठ्या प्रमाणात बाईक टॅक्सी चालक आणि असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
'अपना बाईक टॅक्सी असोसिएशन'च्या प्रमुख मागण्या
- बाईक टॅक्सीला मुंबईत परवानगी मिळावी.
- चालकांसाठी डिलीव्हरी आणि बाईक टॅक्सी सेवांसाठी एकसारखे नियम लागू करावेत.
- ५० cc पेक्षा जास्त क्षमतेच्या, सर्व कंपन्यांच्या आणि रंगाच्या दुचाकींना बाईक टॅक्सी म्हणून परवानगी मिळावी.
असोसिएशनकडून नवी मुंबई आरटीओ येथे मागण्यांचे निवेदन देण्यात आलेले आहे. तरी या बाईक टॅक्सी पुर्वीसारख्या सुरु झाल्यास १ लाखाहून अधिक चालकांना रोजगार आणि ४ लाखांहून अधिक लोकांना सेवा मिळेल. त्यामुळे परिवहन विभागाने यासंदर्भात योग्य तो निर्णय लवकरात लवकर घ्यावा.