पुणेकरांची पाण्याबाबत चिंता मिटली!

02 Aug 2024 16:15:00

Pune dam
 
पुणे : राज्यात एका आठवड्यापासून मुसळधार पाऊस आहे. गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यात तुफान पाऊस पडल्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. या चारही धरणांमध्ये ९०.७६ टक्के पाणी साठा आहे.तर मागच्या वर्षी हीच आकडेवारी ८१.२२ टक्क्यांवर होती , आणि खडकवासला धरण ७२.८३ टक्के भरले आहे. तसेच पुम्यातील पानशेत धरण देखील ९०. ७२ , तर वरसगाव धरणात ९२.८२ टक्क आणि टेमघर धरणात ९३.२८ टकके पाणीसाठा आहे.
 
दरम्यान मावळमधील पवना धरण ९२ टक्के भरलेले आहे. तर मावळमध्ये सध्या पाऊस देखील जास्ती प्रमाणात पडत आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धरणांची पाणी पातळी वाढली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0