'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’; भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेमाचा बंध २०२५ ला उलगडणार

19 Aug 2024 11:40:44

muktai  
 
 
मुंबई : रक्षाबंधन हा भावाबहिणीतील नात्याचा बंध अधिक दृढ करण्याचा सण. आई वडीलांच्या देहत्यागानंतर मुक्ताईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने दटावले देखील. या निवृत्ती महाराज, सोपान, ज्ञानेश्वर आणि मुक्ताई या भावंडांचे नाते अतिशय आदर्शवत, सुंदर असेच होते. या चारही भावंडांच्या चरित्रात पावलो पावली बहिण भावाच्या पवित्र नात्याचा प्रत्यय देणारे प्रसंग दिसतात. प्रत्येक प्रसंगात मुक्ताई आणि तिचे तीनही भाऊ एकमेकांना सांभाळताना, जपताना दिसतात. उदाहरणार्थ मुक्ताईच्या अपमानामुळे व्यथित न होता तुच्या शब्दाचे रक्षण करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी आपल्या पाठीची लाही लाही करून घेऊन मांडे भाजले.
 
गावात होणाऱ्या अपमानामुळे दुःखी झालेल्या ज्ञानेश्वरांना ताटी उघडायला लावून ज्ञानेश्वरी लिहायला प्रेरणा मुक्ताईने दिली. हीच कथा वेळोवेळी मुक्ताई ला अध्यात्मिक बाबतीत महत्त्व देणाऱ्या तिच्या गुरुबंधूंच्या निवृत्तीनाथांच्या बाबतीत पहायला मिळते. संत ज्ञानेश्वरांचे आणि मुक्ताईचे नाते तर कोणत्याही काळाच्या पलीकडचे, लोभसवाणे असलेले दिसते. याच विश्वाला मांगल्य प्रदान करणाऱ्या निरागस, निष्पाप आणि पवित्र नात्याचा उलगडा दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी “संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटात होताना आपल्याला दिसणार आहे. माउली ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई या भावाबहिणीच्या नात्यातील प्रेमाचा बंध उलगडणारे आकर्षक पोस्टर रक्षाबंधनाच्या मंगल दिवशी प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य मराठी चित्रपट नववर्षारंभी ३ जानेवारी २०२५ ला आपल्या भेटीला येणार आहे.
 
चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी, निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आणि सोपानच्या भूमिकेत अभीर गोरे आहे.
Powered By Sangraha 9.0