छत्रपती संभाजीनगर : कट्टरपंथी युवकाने हिंदू युवतीला प्रेम संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती केली. जर प्रेमसंबंध ठेवले नाहीतर तुझ्या भावाला जीवे मारेल, अशी धमकी कट्टरपंथी युवकाने दिली होती. कट्टरपंथी युवकाच्या त्रासाला कंटाळून हिंदू पीडितीने १८ ऑगस्ट रोजी विहीरीत उडी मारत आत्महत्या केली. पीडितेचे नाव पूजा शिवाजीराज पवार असे होते. तर कट्टरपंथी युवकाचे कासिम यासीन पठाण असे नाव आहे.
यासीन हा गेल्या आठ महिन्यांपासून पीडितेचा पाठलाग करत होता. त्याने अनेकदा पीडितेला प्रेमसंबंध ठेवण्याची मागणी केली. मात्र ती मागणी पीडितीने धुडकवली होती. याप्रकरणाआधी युवतीच्या कुटुंबियांनी कासिम यासीनला अनेकदा मारहाणही केली होती, मात्र यासीनने अनेकदा तिच्यावर प्रेमसंबंध ठेवण्याची जबरदस्ती केली होती.
गेल्या आठ महिन्यांपासून हे सत्र सुरूच होते. दरम्यान, पूजा ही संभाजीनगरात विज्ञात शाखेत शिक्षण घेत होती. तिला शिक्षणाची आवड असून तिने इयत्ता १० वीच्या वर्षात ९६ टक्के गुण मिळवले होते. तर कासिम यासीन हा एका गॅरेजमध्ये मॅकॅनिकचे काम करायचा. आपल्या विद्यालयीन शिक्षणासाठी पूजा संभाजीनगरात आली होती. त्यानंतर रक्षाबंधनासाठी तिने आपले हरसूल गाव गाठले. मात्र त्यावेळी कट्टरपंथी युवक कासिम यासीन पठाण हा पूजाला त्रास देऊ लागला. तू जर माझ्याशी बोलली नाहीतर मी तुझ्या भावाला मारेल अशी धमकीच कासिमने दिली.
त्यानंतर पीडितेने हरसुल गावात दुपारी १ वाजताच्या सुमारास एका विहीरीत उडी मारत आत्महत्या केली. या आत्महत्येने पीडित तरूणीच्या कुटुंबियांना धक्का बसला. त्यांनी आरोपी कासिम यासीन पठाणवर हरसुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याच्यावर कडक कारवाई करा अशी मागणी पीडित मृत युवतीच्या कुटुंबियांनी केली आहे. याप्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.