वायनाडमध्ये डुक्करांच्या मांस विक्रीवरुन वाद का सुरू झाला?

19 Aug 2024 15:34:53

Pig Meat
 
तिरुवनंतपुरम : वायनाडमध्ये डुकरांच्या मांसविक्रीवर कट्टरपंथी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. जिल्ह्यातील भूस्खलनग्रस्तांना वाचवण्यासाठी केरळच्या काही कम्यिनिस्ट विद्यार्थी संघटनांनी डुकराचे मांस विकले. मिळालेल्या निधीतून भूस्खलनग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आला. मात्र, यामुळे आता केरळातील कट्टरपंथी तसेच काही मौलवी संतापले आहेत. डुकराचे मांस विकल्याने कट्टरपंथींच्या भावना दुखावल्या आहेत. १० ऑगस्ट रोजी कासारगोडच्या राजापुरम भागात डुकराचे मांस विकल्याची घटना घडली असून यामुळे वाद निर्माण झाला आहे.
 
कासारगोडच्या राजापुरम भागात १० ऑगस्ट रोजी डुकराचे मांस विकले गेले होते. तसेच १८ ऑगस्ट रोजी कोठामंगलम येथे कम्युनिस्ट युवकांनी डुकराचे मांस विकले. या मांसातून जमा झालेला निधी हा वायनाड येथील भूस्खलनग्रस्तांसाठी मदत म्हणून देण्यात आला असल्याचे कम्युनिस्ट विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
 
या निधीतून वायनाड येथील जमीनदोस्त झालेल्या २५ घरांचे बांधकाम करण्याचा निर्णय कम्युनिस्टवाद्यांनी घेतला. तसेच इतर वस्तू विकूनही त्यांनी भूस्खलनग्रस्तांना मदत करणार आहेत. यासाठी ७००० लीटर दुध विकून आलेला निधी भूलग्रस्तांना देण्यात यईल असे सांगण्यात आले. कम्युनिस्टवाद्यांनी डुकराचे मांस विकून भस्खनग्रस्तांना केलेल्या मदतीवर कट्टरपंथींना संतापले आहेत. या कृत्यामुळे कट्टरपंथींचा अपमान असल्याचा दावा केरळचे कट्टरपंथी मौलवींनी केला आहे. तसेच एका सुन्नी संघटनेच्या मौलानाने सांगितले की, वायनाड दुर्घटनेतून वाचलेले काही लोक डुकराचे मांस खात नाहीत, त्यामुळे हा त्यांचा अपमान आहे, असा दावा त्यांनी केला.
 
सुन्नी मौलाना नसर फैजी कुडथाई म्हणाले की, भूस्खलनग्रस्त हे कट्टरपंथी आहेत. त्यांच्यासाठी डुकराचे मांस गोळा करून त्यांना मदत करत आहेत. तेही मुस्लिम आहेत ती लोकं डुकराचे मांस खात नाही. हा त्यांचाच अपमान असल्याचे सुन्नी मौलाना नसर फैजी म्हणाले आहेत.
याचप्रकरणात दुसरे मौलवी झियाउद्दीन फैजी यांनी लिहिले की, कट्टरपंथ्यांना हलाल आणि हराममधून कमाई केलेल्या व्यक्तीकडून मदत स्वीकारण्याला विरोध आहे. हा नियम, दुकानचालक, हॉटेल चालक, बार चालक प्रत्येकाला लागू होतो. त्यानंतर ते म्हणाले की, गरिबांना मदत करण्यासाठी डुकराचे मांस विकून मदत करणे कितपत योग्य आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. गरिबांना मदत करण्याच्या हेतूने उद्या वैश्याव्यवसाय, चोरी असे कृत्य केले जाईल का? असा प्रश्न निर्माण करण्यात आला.
 
 
Powered By Sangraha 9.0