तुम्हालादेखील इंजिनियर बनायचे आहे का, उद्योगांमध्ये सर्वोत्तम, जाणून घ्या वार्षिक पगार किती?

18 Aug 2024 15:20:12
engineer cognizent it industry
 
 
मुंबई :        अभियंता(इंजिनियर) म्हणून नोकरी करण्यासाठी उद्योग क्षेत्रात सर्वोत्तम असल्याचे समोर आले आहे. अभियंत्यांसाठी नोकरी करताना वार्षिक वेतन ४ ते १२ लाख रुपये इतके देण्यात येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी कॉग्निझंट दरवर्षी कॉग्निझंट नवीन अभियंते आणि नॉन-इंजिनीअरिंग पदवीधरांना विविध भूमिकांसाठी नियुक्त करते.
 
आयटी प्रमुख कॉग्निझंटने सांगितले की, नवीन अभियांत्रिकी पदवीधरांना ४ ते १२ लाख रुपये पगार देण्यात येतो. तसेच, कंपनीने सोशल मीडियावर नमूद केलेला पगार हा बिगर अभियांत्रिकी पदवीधर पदवीधारकांसाठी आहे. विशेष म्हणजे नवीन नियुक्त्यांना २.५२ लाख रुपये वार्षिक वेतन ऑफर केल्याबद्दल कंपनी सोशल मीडियावर टीकेला सामोरे जात आहे.
 
दरम्यान, कंपनीला केवळ एक टक्का वार्षिक पगारवाढ दिल्याने सोशल मीडियावर टीकेला सामोरे जावे लागले. तथापि, कंपनीने वैयक्तिक कामगिरीच्या आधारे दिलेली १-५ टक्के वार्षिक पगारवाढीची ही निम्न श्रेणी आहे. नवीन अभियांत्रिकी पदवीधरांसाठी आमचे वार्षिक मानधन ४ लाख ते १२ लाख रुपये वार्षिक वेतन आहे. नियुक्ती, कौशल्ये आणि अत्याधुनिक उद्योग मान्यता प्रमाणपत्रांच्या श्रेणीवर अवलंबून असते.


 
Powered By Sangraha 9.0