धारावी पुनर्विकास : पाच महिण्यात १० हजार घरांचे सर्वेक्षण.

18 Aug 2024 18:28:35
dharavi redevelopment
 

मुंबई ( प्रतिनिधी ) :      धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत गेल्या पाच महिण्यात १० हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले,तर २१ हजार झोपडपट्टी बांधकामाना प्रत्येकी युनिक नंबर देण्यात आला आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा.लि.आणि अदानी समूहामार्फत १८ मार्च पासून माटुंगा रोड रेल्वे स्थानकाजवळील कमला रमण नगरातून सर्वेक्षण सूरू करण्यात आले, आणि आज पर्यंत धारावीतील निवासी व व्यवसायिक घरोघरी भेटी प्रक्रियेद्वारे १० हजार घरांचे आणि पहिल्या मजल्यावरील ५ हजार घरांचा डेटा गोळा करण्यात आला आहे.
 
धारावी सर्वेक्षणाला काही रहिवाश्यांकडून विरोध केला जात असून दुसरीकडे धारावीतील सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. आठ महिन्यात येथील झोपड्यांचे सर्वेक्षण पुर्ण केले जाणार आहे. धारावी प्रकल्पात पात्र आणि अपात्र रहिवाश्यांना घरे मिळणार असल्याची¹ माहिती डीआरपी'चे तहसीलदार रविंद्र बाविस्कर यांनी मुंबई तरूण भारत'ला दिली.
 
 
 
Powered By Sangraha 9.0