'रे रोड' येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी १५ दिवसांसाठी तात्पुरती बंद

    17-Aug-2024
Total Views |
Hindu Vaikunth Dham Electricity Crematorium


मुंबई :
मुंबई महापालिकेच्या ई विभागातील हिंदू वैकुंठधाम स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीच्या तांत्रिक दुरुस्तीचे आणि परिरक्षणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दि. १७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या कालावधीत स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी सेवा बंद राहणार आहे. विद्युतदाहिनीशी संबंधित कामे पूर्ण झाल्यानंतर ही विद्युतदाहिनी नागरिकांच्या सेवेत पुन्हा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान याठिकाणी असणारी पारंपरिक पद्धतीची अंत्यविधी सेवा कार्यरत आहे, असे महानगरपालिकेच्या 'ई' प्रभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याद्वारे कळविण्यात आले आहे. तसेच या स्मशानभूमीव्यतिरिक्त नजीकच्या चंदनवाडी, वरळी येथील स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीचा पर्याय या कालावधीत उपलब्ध असेल, असेही 'ई विभाग' कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.