"अल्लाह शिवाय कुणीही इबादतेच पात्र नाही!", तिरंग्यावर हे वाक्य लिहीणाऱ्या सहा जणांवर खटला

17 Aug 2024 14:53:10

Ilahabad Court
 
लखनऊ : अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Ilahabad High Court) राष्ट्रध्वजावर कुराणचे आयात लिहिणाऱ्या उत्तर प्रदेशातील सहा जणांवरील कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशातील गुलामुद्दीनसह इतर पाच जणांवर अलाहबाद उच्च न्यायालयाने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच कट्टरपंथी युवकांनी तिरंग्यावर केलेल्या कृतीने राष्ट्रध्वजाचा अवमान झाला असल्याचा दावा उच्च न्यायालयाने केला आहे. याप्रकरणात न्यायमूर्ती विनोद दिवाकर यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे.
 
न्यायमूर्ती विनोद दिवाकर म्हणाले की, हे कृत्य म्हणजे राष्ट्रध्वजाचा अपमान आहे. राष्ट्राचा अपमान करणारा प्रतिबंधक कायद्याच्या कलम दोनचे उल्लंघन होत असल्याचे दर्शवत आहे. भारताचा राष्ट्रध्वज हा धार्मिक, वंशिक आणि सांस्कृतिक भेदांच्या पलिकडे जाऊन राष्ट्राची एकात्मता आणि विविधतेचे प्रतीक आहे, असे विनोद दिवाकर म्हणाले आहेत.
 
न्यायालयाने म्हटले की, राष्ट्रध्वज हा भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे. तिरंग्याचा अनादर करण्याच्या कृतीने भारतातासारख्या देशातील विविध जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पुढे इलाहबाद उच्च न्यायालयाने सांगितले की, असे कृत्य करणाऱ्यांना देशात वाद घडवून आणायचे आहेत. भारतात विविध जाती-धर्मांचे लोक राहतात त्यांच्यात गैरसमज पसरवण्याचे काम कट्टरपंथी करत असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. 
 
काय आहे प्रकरण?
 
दरम्यान उत्तर प्रदेशातील जालौन पोलीस ठाण्यात मागील वर्षी गुलामुद्दील आणि त्याच्यासह इतर ५ कट्टरपंथींनी राष्ट्रीय सन्मान निवारण कायदा १९७१ कलम २ नुसार तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी कट्टरपंथीं आरोपींनी जामीनाची मागणी केली होती. युक्तीवादात संबंधित आरोपीच्या वकिलांनी युक्तीववाद करताना सांगितले की, तक्रारीत तिरंगी झेंडा हा दुसराच तिरंगी झेंडा आहे.
 
आरोपींच्या वकिलांनी सांगितले की, पोलिसांनी अद्यापही असे कोणतेही पुरावे आणले नाहीत. कायद्याच्या कलम २ आणि ३ नुसार राष्ट्रीय ध्वजासोबत कोणतेही चाळे केलेले नाहीत. कारवाईनंतर वकिलांनी सांगितले की, एफआरआय दाखल केल्यानंतर आरोपींना खोटे ठरवण्यात आले होते.  
 
याचदरम्यान राज्य सरकारने सांगितले की, मिरवणुकीदरम्यान तिरंगा फडकवण्यात आला होता. त्यावेळी तिरंग्यावर अरबी भाषेतील श्लोक लिहिण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस खुर्शीद आलम, एशानुल्ला आणि रामदास यांनी न्यायालयात जबाब नोंदवला आहे.
 
या प्रकरणात सराकरी वकिलांनी सांगितले की, काझी मौलाना साबीर अली यांना जालौन येथे बोलावले गेले आणि तिरंग्यावर लिहिण्यात आलेला मजकूर वाचण्याच सांगितला. त्यांनी सांगितले की त्यात अरबी भाषेतील इलाही इलिल्लाह मुहम्मद उल रसूल अल्लाह लिहिले आहे, ज्याचा अर्थ आहे, अल्लाहशिवाय कोणीही उपासनेस पात्र नाही", याशिवाय मुस्लिम पैगंबर मुहम्मद यांचे नातू अली यांचा जुल्फकार’ याच्याशी संबंधित एक ओळ लिहिली आहे.
 
अलाहबाद उच्च न्यायालयाने युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर दाखल केलेली याचिका फेटाळून लावली आहे. न्यायालयाच्या निर्णयात कोणतीही बेकायदेशीरता, विकृती किंवा इतर कोणतीही त्रुटी आढळली नाही, ज्यामुळे सीआरपीएफच्या कलम ४८२ अंतर्गत अधिकाऱ्यांच्या न्यायालयाच्या हस्तक्षेपाचे समर्थन होईल, असा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला आणि आरोपींवरील कार्यवाही सुरूच ठेवली. 
 
 
Powered By Sangraha 9.0