मुंबई : कोलकता येथील रुग्णालयात महिला डॉक्टरवर पाशवी अत्याचार करून तिची नृशंस हत्या केल्याच्या निषेधार्थ देशभरात डॉक्टरांचा बेमुदत संप सुरू असताना आता केमिस्टही रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारी सायंकाळी ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने खोपट कार्यालय येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
यावेळी, नराधम आरोपीला नागरीकांच्या हवाली करावे तसेच, प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजिनाम्याची मागणी करण्यात आली. जर नराधम आरोपींवर कारवाई झाली नाही तर सर्व केमिस्ट आपली दुकाने एक दिवस बंद ठेवतील, असा इशारा देण्यात आला आहे.याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष विलास जोशी,सचिव सुरेश भट्ट, कोषाध्यक्ष रमेश चौधरी, उपाध्यक्ष विजय सुराणा, अतुल मिसाळ, आसद चाऊस, अमृता चौधरी, रेश्मा दळवी आदीसह अनेक केमिस्ट उपस्थित होते.