मुंबई : वक्फ बोर्डाप्रमाणे आरक्षणाचं बिल आणा आमचा पाठिंबा राहिल, असं विधान उद्धव ठाकरेंनी केलं आहे. मराठा आरक्षणावरुन सध्या राज्यातील वातावरण तापलं असून मराठा समाजातील लोक अनेक नेत्यांना आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्यास सांगत आहेत. दरम्यान, आता उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं.
उद्धव ठाकरे म्हणाले की., "महाराष्ट्रात मराठा, ओबीसी, धनगर या समाजासमाजांत तुम्ही आग लावली आहे. मी, शरद पवार आणि काँग्रेसने आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही. बिहारने मर्यादा वाढवल्यानंतर कोर्टाने ती उडवून लावली. त्यामुळे हा अधिकार फक्त आणि फक्त लोकसभेचा आहे. अन्यथा राष्ट्रपती हे करू शकतात. मराठा आरक्षणाचं बिल लोकसभेत मांडा, मर्यादा वाढवा, ओबीसींचं आरक्षण तसंच ठेवा. धनगरांना द्या, सर्वांना द्या. आम्ही सगळे महाविकास आघाडीचे लोक त्याला पाठिंबा देऊ. आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं बिल आणा," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - "आमच्या भावांना बहिणीचं नातं..."; सुप्रिया सुळेंचं विधान
तसेच यावेळी उद्धव ठाकरेंनी वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली. वक्फ असो किंवा कोणत्याही धर्माच्या जागा असो, आम्ही त्यामध्ये काहीही वेडवाकडं होऊ देणार नाही," असे ते म्हणाले. त्यानंतर आता त्यांनी वक्फ बोर्डाप्रमाणेच आरक्षणाचं विधेयक आणण्याचीही मागणी केली आहे.