कोलकाता : पं. बंगालच्या बर्दवान जिल्ह्यातील एका २२ वर्षे युवतीचा गळा घोटून हत्या करण्यात आली. याघटनेमुळे प. बंगाल येथे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मात्र अद्यापही मृत्यूबाबतचा खुलासा करण्यात आलेला नाही. युवतीच्या निकटवर्तीयांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली आहे. युवतीच्या नातेवाईकांनी सांगितले की, ती बंगळुरू येथील एका शॉपिंग मॉलमध्ये काम करत होती. १२ ऑगस्ट रोजी तिने सुट्टी घेत आपल्या घरी आली होती. त्याच सायंकाळी हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
मृत युवती पीडितेच्या नातेवाईकांनी ही हत्या असल्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, पीडित युवती घराजवळ मोबाईलवर बोलत होती. तिला कोणाचा तरी फोन आला आणि ती तिथून निघून गेली. बराच वेळ झाला तरीही ती तिथून आली नाही. तिला अनेकदा फोनद्वारे संपर्क करण्यात आला मात्र तिने फोन उचलला नाही. गळा चिरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तिच्यावर बलात्कार झाला की नाही याबाबतची माहिती अद्यापही समोर आलेली नाही.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात सांगण्यात आले की, पीडित मुलगी घरातून निघाली त्यावेळी ती मोबाईलवर बोलत होती. याप्रकरणात लक्ष घातले. पोलिसांचे म्हणणे आहे की, पीडित युवती आपल्या घरापासून दूर जात मोबाईलवर बोलत होती. याचा अर्थ फोनवर बोलणारी व्यक्ती अनेक दिवसांपासून युवतीच्या ओळखीची असावी.
दरम्यान, याप्रकरणात भाजप नेते अग्निमित्र पॉल यांनी तृणमूल सरकारला चांगलेच झापले आहे. पं.बंगालमध्ये ममता बॅनर्जींचे सरकार असूनही महिला सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर दिवसेंदिवस अन्याय, अत्याचार होत आहेत. ते म्हणाले की, सरकार अशा घृणस्पद कृत्यांवर कधीपर्यंत डोळे बंद करून बसणार आहेत. राज्यातील अराजकता केव्हा नष्ठ होईल? आम्ही अशा घृणास्पद कृत्याविरोधात न्याय आणि कारवाईची मागणी करत आहोत.
याच घटनेप्रकरणी त्यानी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, शक्तिगड येथील नादुर झापनतला नजीकच्या भागात आदिवासी पाड्यात एक धक्कादायक घटना घडली होती. याठिकाणी एका युवतीचा गळा घोटून हत्या करण्यात आली होती. पोलिस अधीक्षक अर्का बॅनर्जी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.
त्यांनी सांगितले की, पोलीस अधीक्षक अर्का बॅनर्जी यांनी घटनास्थळी पाहणी केली. प्रियंका ही नांदुर गाव येथील रहिवासी होती. तिच्या वडिल सुकांत हंसदा यांचे याच विभागात टेलरिंगचे दुकान आहे. बुधवारी रात्री तिने आपल्या कुटुंबाला बाथरूमला जात असल्याचे कारण सांगितले होते. मात्र बराच वेळ झाला. त्यानंतर प्रियंकाची आई तिला पाहण्यासाठी बाथरूमकडे आली. मात्र ती त्याठिकाणी नव्हती.
तसेच त्यांनी पुढे सांगितले की, बऱ्याच वेळानंतर शोधाशोध केल्यानंतर एका शेतात तिचा मृतदेह सापडला. त्यावेळी तिचा गळा कापण्यात आला होता. या विभित्स घटनेने एकच खळबळ उडाली. एडिशनल एसपी अर्का बॅनर्जींनी सांगितले की अद्याप प्राथमिक माहिती समोर आली आहे. वेळ आल्यानंतर सविस्तर माहिती लवकरच येईल.