बांगलादेशी हिंदूंच्या सद्यस्थिती निषेधार्थ नाशिक बंदची हाक

16 Aug 2024 14:43:36

Nahsik Band

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Nashik Band News) 
बांगलादेशी हिंदू आणि तेथील मंदिरांच्या रक्षणासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत यानिमित्ताने सकल हिंदू समाजातर्फे शुक्रवारी नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली. बांगलादेशात आरक्षणाच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन हिंसक वळणावर जाताच एकून २७ ठिकाणी हिंदुंना लक्ष्य करण्यात आले. याप्रकरणी नाशिक मधील सर्व हिंदू संघटना, हिंदू बांदव व राजकीय पक्षांनी एकजुटीने संपूर्ण नाशिक बंदची हाक देण्यात आली.
 
हे वाचलंत का? :  कोलकाता येथे आंदोलक आणि रूग्णालयावर गुंडांचा हल्ला
 
या बंदला विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जनजागृती समिती, समविचारी राजकीय पक्ष, इ. हिंदुत्ववादी संघटनांनी पाठींबा जाहीर केला आहे. सर्व नाशिकरांनी या बंदमध्ये सहभागी होऊन बांगलादेशी हिंदूंच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आले होते.
 
Powered By Sangraha 9.0