राष्ट्रवादी काँग्रेसचा बारामतीबद्दल मोठा निर्णय!

16 Aug 2024 11:50:51
 
NCP
 
पुणे : गुरुवारी रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली असून यात बारामतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणूकीत बारामतीतून कोणता उमेदवार असणार? असा संभ्रम निर्माण झाला असताना आता अजित पवार हेच बारामतीतून लढणार असल्याची माहिती पुढे आली आहे.
 
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुरुवारी आपण बारामतीतून विधानसभा निवडणूक लढणार नाही, असे संकेत दिले होते. शिवाय त्यांनी बारामतीतून जय पवारांच्या उमेदवारीबाबतही भाष्य केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात होते.
 
या सगळ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात रात्री उशीरा बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. दरम्यान, या बैठकीनंतर अजित पवार हेच बारामतीतून निवडणूक लढवण्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0