सूरजने दिलाच 'बुक्कीत टेंगुळ'!; टास्कमध्ये थेट अरबाजला नडला

16 Aug 2024 13:00:19

suraj  
 
मुंबई : मराठी बिग बॉसच्या सीझन ५ चा तिसरा आठवडा सुरु आहे. घरातील सदस्यांनी पहिल्याच दिवसापासून घरात कल्ला करायला सुरुवात केली होती, तर काही सदस्य आता हळूहळू आपले रंग आणि ताकद दाखवत आहेत. बिग बॉस देत असलेले एकापेक्षा एक टास्क पूर्ण करण्यात सदस्यांच्या अगदी नाकीनऊ येत आहे. त्यातच दोन टीम पडल्या असून एकमेकांमध्ये हाणामारीपर्यंत भांडणं सुरु झाली आहेत. या सगळ्यात नेहमी शांत असणाऱ्या साध्याभोळ्या सूरजने मात्र आता टास्कवेळी रौद्र रुप धारण केलं आहे.
 
नेहमी शांत असणाऱ्या आणि प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणाऱ्या सूरज चव्हाणने आता त्याचं हत्यार काढलं असून त्याचं रौद्र रुप पाहायला मिळत आहे. सूरज आणि अरबाज टास्कवेळी आमनेसामने आले आहेत. तर दुसरीकडे वैभव सूरजला काही सूचना करताना दिसत आहे. 'तू हात पाय असं का मारतोय? असं वैभव त्याला विचारतो. त्यावर सूरज चिडून 'त्याला हाणलं नाहीये मी अजून...माझं मी बघेन' असं म्हणतो. हा प्रोमो सध्या तुफान व्हायरल होतोय. अखेर सूरज आता चवताळून उठल्याने त्याचे चाहतेही खूश झालेत.
 

suraj  
 
दरम्यान, यावेळीचा कॅप्टन्सी टास्क सूरज गाजवणार हे नक्की आहे. सूरजचा हा अवतार पाहून घरातले सदस्यही शॉक झाले आहेत. यावेळी कॅप्टन्सी कोणत्या टीमकडे जाते आणि कोण कॅप्टन होतो हे याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
Powered By Sangraha 9.0