मुंबई : मराठी बिग बॉसचा पाचवा सीझन सध्या जोरदार सुरु आहे. प्रत्येक सदस्य एकमेकांच्या नाकीनऊ आणताना पहिल्या दिवसापासून दिसत आहे. सर्वच सदस्य जबरदस्त खेळ खेळून घरात स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहेत. टास्कमध्ये बऱ्याचदा भांडणं तर होतातच पण सदस्य नव्या भागात आपल्याला भावुक होताना दिसणार आहेत. बिग बॉसने सदस्यांना फोन घेऊन कुटुंबाशी बोलायला सांगितलं. त्यावेळी सर्वच सदस्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसलं.
बिग बॉस मराठीचा नवीन प्रोमो रिलीज झाला असून फोन टास्कमध्ये यात कुटुंबाशी बोलताना सदस्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं दिसत आहे. सुरुवातीला पाहायला मिळालं की, वर्षा उसगावकर बाबांच्या आठवणीत भावुक होऊन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. तर दुसरीकडे अंकिता मालवणी भाषेत रडत रडत बोलताना दिसते की, "तुझ्या वांगडा शेवटचा बोलायचा रवला रे." पुढे निक्की तांबोळी, अरबाज, छोटा पुढारी, आर्याच्या डोळ्यांतही पाणी आलेलं दिसतं. पुढे सूरजही आईच्या आठवणीत भावुक झालेला दिसला.
दरम्यान, बिग बॉस मराठीमध्ये दुसऱ्या कॅप्टनसीसाठी लढत पाहायला मिळणार आहे. घरातील नवीन कॅप्टन पदासाठी अरबाज पटेल, निक्की तांबोळी, सूरज चव्हाण हे तिघे कॅप्टनसी कार्यासाठी खेळ खेळताना दिसणार आहेत. आता घराचा नवीन कॅप्टन कोण होईल हे लवकरच समजेल.