“…और मिला क्या है मुझे इस देश से”, कंगनाच्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

15 Aug 2024 11:14:39

kangana  
 
 
 
मुंबई : कंगना रणावत दिग्दर्शित आणि अभिनित ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा नुकताच ट्रेलर लॉंच झाला. तसेच, नोव्हेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची दोन वेळा तारीख बदलण्यात आली होती पण अखेर निश्चित प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर करण्यात आली आहे. ‘इमर्जन्सी’ चित्रपटात २१ महिने देशात लागू केलेला आणीबाणी काळ पाहायला मिळणार आहे.
 
कंगना रणावत यांनी सोशल मीडियावर ‘इमर्जन्सी’ चित्रपटाचा ट्रेलर शेअर केला असून ‘इंडिया इज इंदिरा अँड इंदिरा इज इंडिया’, देशातच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली महिला आणि तिने इतिहासात लिहिलेला सर्वात काळा अध्याय”, असं कॅप्शन लिहिलं आहे.
 
 
 
‘इमर्जन्सी’ या बहुचर्चित चित्रपटात कंगना यांच्यासह अनुपम खेर, श्रेयस तळपदे, मिलिंद सोमण असे दिग्गज कलाकार पाहायला मिळणार आहेत. ६ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून ‘इमर्जन्सी’ चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
Powered By Sangraha 9.0