नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचा माजी गोलकीपर पी आर श्रीजेशने आंतरराष्ट्रीय सामन्यांतून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर आता श्रीजेशची १६ क्रमांकाची जर्सी निवृत्त केली आहे. दरम्यान, हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग यांनी मोठी घोषणा केली असून जवळपास दोन दशकांपासून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या श्रीजेशची कनिष्ठ संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षकपदी निवड केली आहे.
हे वाचलंत का? -
अदानी ग्रुपला आणखी मोठा दिलासा, आता देशांतर्गत बाजारपेठेत उतरणार
दरम्यान, हॉकी इंडियाने गोलकीपर पीआर श्रीजेशची १६ क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये श्रीजेशने उत्तम कौशल्य दाखवत भारतीय संघाला उपांत्यपूर्व फेरीपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली होती. तसेच, सेमी फायनल सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर कांस्यपदक सामन्यात भारताने स्पेनवर २-१ने विजय मिळविला आहे.
देशाला सलग दुसरे ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर श्रीजेशने हॉकीमधून निवृत्ती घेतली. हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग म्हणाले, श्रीजेश आता ज्युनियर संघाचा प्रशिक्षक बनणार आहे आणि आम्ही वरिष्ठ संघासाठी १६ क्रमांकाची जर्सी निवृत्त करत आहोत. आम्ही कनिष्ठ संघासाठी १६ क्रमांकाची जर्सी निवृत्त करणार नसल्याचेही सिंग यांनी यावेळी सांगितले.