बांगलादेश निवडणुकीत हिंदूंच्या भूमिकेबाबत संयुक्त राष्ट्राचे विशेष आवाहन!

14 Aug 2024 15:09:56

UN on Bangladesh Election

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (UN on Bangladesh Election) 
बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकार नुकतेच स्थापन झाले. दरम्यान, संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरेस यांनी बांगलादेशमध्ये संसदीय निवडणुका घेण्याचे तसेच अंतरिम सरकारला सर्वसमावेशक होण्यासाठी शक्य ते प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः युएनच्या प्रमुखांनी निवडणूक प्रक्रियेत महिला तसेच अल्पसंख्याक समुदायांचाही समावेश करण्याचे आवाहन केले आहे.

हे वाचलंत का? : बांगलादेश हिंसाचाराची पश्चिम बंगालमध्ये पूर्नरावृत्ती!

अँटोनियो गुटेरेस यांचे उप प्रवक्ते फरहान हक यांनी एका निवेदनात म्हटले की, अँटोनियो गुटेरेस यांनी अंतरिम सरकारला आगामी आठवड्यात सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे. देशातील महिला, तरुण आणि लोकांचा आवाज तसेच अल्पसंख्याक आणि आदिवासी समुदायांचा समावेश असले महत्त्वाचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अँटोनियो गुटेरेस यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा बांगलादेशातील अस्थिरतेसाठी अमेरिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

Powered By Sangraha 9.0