सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप हॅक! हॅकरकडून तब्बल 'इतक्या' डॉलरची मागणी

    14-Aug-2024
Total Views |
 
Supriya Sule
 
पुणे : राष्ट्रावादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्हॉट्सॲप हॅक झाले आहे. त्यांनी रविवारी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली होती. तसेच सर्वांनी आपल्या डिजिटल सुरक्षेविषयी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहनही केले होते. दरम्यान, आता याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
 
 
 
सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप हॅक करणाऱ्या हॅकरने तब्बल ४०० डॉलरची मागणी केल्याचीही माहिती पुढे आली होती. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, आता याविरोधात पुणे ग्रामीणच्या यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या स्वीय सहायक महिलेने याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर त्या हॅकरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे ग्रामीणच्या सायबर सेलकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत असून सुप्रिया सुळेंचे व्हॉट्सॲप पुर्ववत झाल्याचेही सांगण्यात येत आहे.